कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये,
समुद्राची गाज साद घालू लागलीये.
मित्रांबरोबर वाडीत मनसोक्त खेळायचंय,
माडावर चढता चढता पुन्हा पडायचंय,
कोपऱ्यातलं जायफळ आता चांगलंच वाढलं असेल,
कोकमाच्या फळांनी पडवी भरली असेल
मागल्या हापूसची गोडी आता अस्वस्थ करू लागलीये
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
माडांच्या कुशीत वसलेला रामेश्वर
किनाऱ्यावर गणेश मंदिरात आरतीचा गजर
दूरवरच्या त्या डोंगरावर दत्त गुरूंचे स्थान
पायथ्याच्या देवीला अवघ्या गावाचा मान
किनाऱ्यावर गणेश मंदिरात आरतीचा गजर
दूरवरच्या त्या डोंगरावर दत्त गुरूंचे स्थान
पायथ्याच्या देवीला अवघ्या गावाचा मान
ऐहिक सुखाच्या विळख्यात भक्ती गुदमरू लागलीये
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
तांदळाचे पापड आणि खमंग कांदेपोहे
आजीच्या हाताला देवाचे देणे
आजोबांबरोबर मासळी बाजारचा प्रवास
मामीच्या हातची सुरमयी झकास
दंगा करून दमल्यावर झोपायला आजीची कुशी
आजोबांच्या पलंगावर पुस्तकांचीच उशी
आजीच्या हाताला देवाचे देणे
आजोबांबरोबर मासळी बाजारचा प्रवास
मामीच्या हातची सुरमयी झकास
दंगा करून दमल्यावर झोपायला आजीची कुशी
आजोबांच्या पलंगावर पुस्तकांचीच उशी
बालपणीच्या संस्कारांची उजळणी बाकी राहिलीये
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
किनाऱ्यावर फिरताना वेळेला विसरायचंय
अनवाणी पायांना त्या लाटेत भिजवायचंय
परतणाऱ्या पक्ष्यांना दूरपर्यंत न्याहाळायचंय
क्षितिजापल्याड जाणाऱ्या 'त्याला' नजर भरून पहायचंय
अनवाणी पायांना त्या लाटेत भिजवायचंय
परतणाऱ्या पक्ष्यांना दूरपर्यंत न्याहाळायचंय
क्षितिजापल्याड जाणाऱ्या 'त्याला' नजर भरून पहायचंय
हरवलेल्या 'स्व'ला शोधायची ओढ लागलीये
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
समुद्राची गाज साद घालू लागलीये.
कोकणाची खूप आठवण येऊ लागलीये.
समुद्राची गाज साद घालू लागलीये.
No comments:
Post a Comment