Monday, March 16, 2015

घडणे - बिघडणे


जेव्हा 'हवंय - नकोय' ची जंत्री गरजेपेक्षा जास्त वाढत जाते
तेव्हा बिघडायला सुरुवात होते.
 
जेव्हा 'मी '- 'माझे' - 'मला' याचा हव्यास वाढतो
तेव्हा बिघडायला सुरुवात होते.
 
जेव्हा भावनिक व्यक्तीनिष्ठतेपेक्षा भौतिक वस्तुनिष्ठता महत्वाची वाटायला लागते
तेव्हा बिघडायला सुरुवात  होते.
 
आणि
 
जेव्हा "मी" चा अहंकार नष्ट होतो
आणि "स्व" चा आत्मविश्वास निर्माण होतो
तेव्हा "घडायला" सुरुवात होते.
 
जेव्हा स्वतःकडे उघड्या डोळ्याने पहायला जमते
आणि "नजरेच्या" जागी "दृष्टी" येते
तेव्हा "घडायला" सुरुवात होते.
 
जेव्हा हव्यासाची जागा ध्यास घेतो
आणि "अर्थ"पूर्ण जीवनाचा खरा "अर्थ" समजू लागतो (pun intended)
तेव्हा घडायला सुरुवात होते.
 
आपण "बिघडायचे" का "आपण बी घडायचे", हे आपले आपण ठरवायला हवे."

No comments:

Post a Comment