Monday, June 11, 2018

पलोमा

पलोमा

जागतिकीकरणाच्या या सुवर्णयुगात अन् वसुधैव कुटुंबकमचा संदेश देणाऱ्या भूमीत जन्माला आलेली तू एका वैश्विक समुदायाचा आपण भाग आहोत याची सदैव जाणीव ठेव.

हा काळ कुठल्याही जात, धर्म, प्रांत याच्या पल्याड जाऊन अखंड मानवजातीच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्यांचा काळ आहे.

तुमचे विचार वैश्विक, तुमची स्वप्ने वैश्विक, तुमच्या कर्तृत्वाच्या संधी वैश्विक, तुमच्या स्पर्धा वैश्विक आणि तुम्हापुढील संकटेही वैश्विकच. या साऱ्या मंथनाचा उद्देश मात्र एकच आणि तो म्हणजे वैश्विक शांततेची स्थापना.

अशा या विश्वशांतीच्या महोत्सवात आमच्याकडून पाठविण्यात येणारी एक शांतिदूत म्हणून तुझं नाव पलोमा, वैश्विक शांतता प्रस्थापित करणारी स्त्री.

No comments:

Post a Comment