आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी गच्च भरलेले असते.
ढगांचा गडगडाट अवघा आसमंत दणाणून सोडत असतो.
डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच एखादी विजेची रेघ कर्णकर्कश्श आवाज करत आकाश दुभंगून जाते.
टपटप करत एकेक थेंब जमिनीवर पडू लागतो. मृद्गंधाचा दरवळ मन प्रसन्न करतो.
अस्ताला जाणारा सूर्य त्या काळ्या नभांच्या पडद्याआडूनच जगाचा निरोप घेतो.
बोरकरांचे स्मरण करीत 'सरीवर सरी' येतात अन बघता बघता 'कोसळती धारा' होतात.
चिंब भिजलेले तन आणि मन.
अशा मोहक क्षणी प्रेयसी, पत्नी, सखी याच्या पल्याड जाऊन मनाला ज्या एकाच गोष्टीची आस लागलेली असते त्याला 'वडापाव' असे म्हणतात.
No comments:
Post a Comment