Tuesday, April 7, 2015

वाईटपणा

समोर उद्भवलेले प्रश्न सोडवायचेच असतील तर कसेही करून सोडवता येतात. फक्त ते प्रश्न मुळापासून उपटून टाकण्याची प्रबळ इच्छा लागते.
त्यामुळे बऱ्याच वेळा काही मनं दुखावली पण जाऊ शकतात. 
पण कधी कधी व्याधी मुळापासून उपटण्यासाठी औषधाचा कडवटपणा सहन करावा लागतोच की, तसंच असतं हे. 
सगळ्यांनाच आवडतील, सगळ्यांनाच मान्य असतील, सगळ्यांनाच सहन होतील, कुणालाच कसलाच त्रास होणार नाही, असे प्रश्न सोडवण्याचे मार्ग खूप दुर्मिळ असतात.
वाईटपणा घेता येत नाही आणि त्यामुळे समोरचा प्रश्न पण सुटत नाही म्हणून तो प्रश्न सहन करण्यात, त्याचा स्वतःला त्रास करत बसण्यात आणि परिस्थितीला त्यासाठी दोष देत बसण्यात काहीच अर्थ नसतो.
पण बऱ्याच वेळा आपण याच गोष्टी करतो. 
वाईटपणा घेणं टाळतो, कधी घाबरून तर कधी सोयीस्करपणे.
स्वतःच स्वतःवर बंधन घालतो आणि दोष मात्र परिस्थितीला देतो.
यात आपण स्वतःचंच नुकसान करत असतो. 
कधी कधी वर्तमानात वाईटपणा घेतल्याने भविष्यात होणारे मोठे नुकसान टळू शकते.
गरज असते ती निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने ते पाऊल उचलण्याची.

No comments:

Post a Comment