Saturday, August 1, 2015

थोडे Analytical Thinking

व्यक्तिमत्वाच्या Fact Table ला आवडी-निवडींच्या अनेक Dimensions असाव्यात. वाचन-लेखन, खेळ, संगीत, प्रवास, जोडलेली माणसे त्यांचे आलेले चांगले-वाईट अनुभव, सुख-दुःख, यश-अपयश अशा असंख्य अनुभवांनी, भावनांनी समृद्ध असे जीवनाचे मग एक Data Warehouse तयार होईल. अर्थातच ते De-Normalised असेल. त्यात अनेक गोष्टींच्या पुनरावृत्तीचा Redaundant Data असेलच. पण भूतकाळात डोकावताना हाच सगळा Data Mine करून आपण आपल्या जगण्यातील Patterns समजून घेऊ शकू.
त्याचे एखाद - दूसरे Algorithm कुठेतरी नोंदवून ठेऊ शकू. हे Algorithm म्हणजेच, आपली जीवनशैली. यात आपण काय शिकलो, काय उणीवा राहिल्या, कुठल्या परिस्थितीत आपण कसे वागलो यावर आत्मपरिक्षण करून भविष्यात आपण काय करायला हवे याचा Predictive Analytics report पण आपण करू शकतो. आयुष्याच्या उत्तरार्धात अनुभवांनी संपन्न असे हे Data Warehouse आपण जगलेल्या जीवनाचा आत्मवृत्तरुपी सुंदर Dashboard बनवण्याची संधी आपल्याला देईल.

No comments:

Post a Comment