रोजच्या जीवनात आपण अनेक गोष्टी शिकत असतो, कळत नकळत, अनेक अनुभव येतात, वेगवेगळ्या गोष्टी वाचनात, पाहण्यात वा ऐकण्यात येतात. ह्या गोष्टी नकळतपणे आपल्या मनावर काहीतरी परिणाम करत असतात.
आपली विचारप्रक्रिया आपल्याला आलेल्या अनुभवातून घडत असते. आपली सद्सद्विवेकबुद्धी समृद्ध होत जाते ती ह्याच विचारप्रक्रियेतून. हीच सद्सद्विवेकबुद्धी आपल्या हातून घडत जाणाऱ्या प्रत्येक कृतीच्या, आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाच्या मुळाशी असते, असावयास हवी.
माझ्या प्रत्येक कृतीच्या मुळाशी असणाऱ्या विवेकबुद्धीला खतपाणी घालणारे असेच माझे काही विचार.
No comments:
Post a Comment