Wednesday, June 11, 2014

मैत्रीण

नेहमी एक विचार यायचा मनात,

आपली पण एखादी मैत्रीण असावी, 
कधी हट्ट करणारी, कधी रुसून बसणारी,
कधी प्रेमळ, कधी एकदम स्पष्ट
कधी अगदी शांत तर कधी मन मोकळ्या गप्पा मारणारी 
पण असावी 'हक्काची'.

मजा यावी,
तिच्याशी बोलायला,
तिला छेडायला,
तिला रुसवायला,
नंतर समजूत घालायला.
चेहऱ्यावर चेष्टा असेल, 
मनात मात्र आदर असेल.
तिच्याबद्दल.

एक मैत्रीण असावी,
स्पष्ट, कठोर पण तितकीच प्रेमळ
ओरडायला लागली की मान खाली जावी, 
नजरेला नजर मिळवायला पण भीती वाटावी.

अशीच एखादी मैत्रीण असावी,
माणूस म्हणून चांगली असणारी

मला पण एक चांगला मित्र बनायची संधी देणारी.

No comments:

Post a Comment