आई कशी आहे?
आई साधी आहे, सामान्य आहे
पिझ्झा पास्ता पेक्षा वरणफळं prefer करणारी आहे
नवरा येईपर्यंत जेवायची थांबणारी आहे.
***
आई तडजोड करणारी आहे, त्यागी आहे
मुलांच्या जडणघडणीसाठी स्वत:च्या आवडीनिवडींना बाजूला सारणारी आहे.
***
आई नाती जोडणारी आहे
अनोळखी गर्दीतून बाहेर पडताना चार जिवाभावाची माणसं जोडणारी आहे.
क्षुल्लक कारणांनी नाती तुटू नयेत, म्हणून तडफडणारी आहे.
***
आई खंबीर आहे
परिस्थितीचा आणि परिणामांचा विचार करून निर्णय घेणारी आहे.
आलेल्या संकटांना धाडसानं सामोरं जाणारी आहे.
अश्रूंना बाजूला सारून, मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याला खंबीर आधार देणारी आहे.
***
आई अपयश सहन करायला शिकवणारी आहे.
कुठे पडलो यापेक्षा कुठे घसरलो याचा विचार करायला लावणारी आहे.
***
आई आता बदलू लागलीये.
TV वरच्या "कुंकू" पायी तव्यावरची पोळी करपू लागलीये.
"Scooty Pep पेक्षा Access किती महाग आहे रे?" असके प्रश्नं आजकाल ऐकू येऊ लागलेत.
***
आमच्या कॉम्पुटर ला पण एक नवा user मिळालाय.
***
पंचेचाळीशी नंतर नोकरी करू लागलेली आई
आता professional झालीये.
शाळेतील कोणत्या गोष्टींचा किती विचार करायचा हे तिला बरोबर कळत.
***
एक खरंय,
आई आता थकू लागलीये,
पाठ, मणका, पाय, पोट आलटून पालटून
तिला तिने आजवर केलेल्या कष्टाची जाणीव करून देत असतात.
***
आमच्यासाठी तिनं खूप केलंय,
आता तिच्यासाठी आम्हाला काहीतरी करायची इच्छा आहे.
पन्नाशी नंतरचं आयुष्य बोनस असतं असं ती म्हणते,
मग हा बोनस तिनं enjoy करावा असं वाटतंय.
***
हिरा कितीही चमकला तरी
पैलू पडणाऱ्याचे ऋण तो कसा विसरेल?
भविष्यात कितीही मोठे झालो
तरी तुझे आजन्म ऋणाईत, हिमांशु आणि सनत.
No comments:
Post a Comment